Sunday, February 12, 2012

सुरुवात………………


करणार, करणार म्ह्णुन मी ज्यासाठी एव्ह्ढा पेटलो होतो ते माझे ब्लोग लिहीण्याचे प्रयत्न आता कुठे पुर्ण झाले, चला शेवटचे आरेन्डि (संशोधन आणि विकास)  केल्यानंतर आता सगळे व्यवस्थित आहे म्ह्णजे मी आता मराठीत टाईप करु शकतो, म्ह्णजे आता मला सगळ्या जगाशी बोलता येईल, अहो कशावर काय म्ह्णुन विचारताय? काकडीच्या फोडी 2 मिनीटे डोळ्यांखाली धरल्यास ब्ल्यक सर्कल जातात किंवा बबडी जातीची आफ्रीकेतील म्हैस 25 लीटर दूध देते, असे थोडेच लीहीणार आहे?, छ्याः! हे सांगण्यासाठी माझी गरज नाही, ते काम ‘संध्यानंदचे’! आणि मुळातच असले विषयसुध्दा intresting होउ शकतात हे मला लग्नानंतर कळले, असो, माहितीच्या या विस्फोटात मी पामर काय तुमचे ज्ञान वाढविणार, पुर्वी माणसाच्या आयुष्यात खुप कमी गोष्टी असत, जसे सकाळ, चहा, नाष्टा, बस, ट्रेन, ओफीस, काम, जेवण, बस, ट्रेन, बायको, मुलं, TV, जेवण, झोप ईत्यादि! फार फार तर गेला बाजार कुणाचे लग्न, मुंज, बारावे बस्स्……!!! पण हल्ली असले काही राहिले नाही हो! या फेसबुक आणि ईतर सोशल नेटवर्कवाल्या साईट्सनी धूमाकुळ घातलाय, म्हणजे आताचे जग हे ई,स,वि सन पुर्व आणि ई,स,वि सन नंतर असे काही आता राहणार नाही, आता कालगणना हि फेसबुकपुर्व आणि फेसबुकनंतर अशी असणारेय, असो। ,,,,,,,,,तर सांगायची गोष्ट अशी की आता मला मनातील सर्वकाही मोकळे करता येईल। आवड्ले तर तसे सांगा, नाही तर तसेही सांगा पण सांगा, बोला। वेळेअभावी महिन्यातुन एकदा किंवा दोनदा भेटू पण नक्की भेटू, ठिकाय तर मी निघतो, (मराठी फोनेटीक किबोर्ड असल्यामुळे काही ठिकाणी चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमस्व !)

2 comments:

  1. AWESOME MAN........
    JABARDAST KALPESH KEEP IT UP.
    अति सुन्दर कल्पेश, खुप छान लिहितोस तु. एक विनन्ति आहे रोज ब्लोग उपडेट करत जा. खुप खुप
    शुभेच्छा..............

    ReplyDelete